तळमळीने गुरुकार्य करणार्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असलेल्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले !
‘ज्येष्ठ शुक्ल षष्ठी (१२.६.२०२४) या दिवशी सुश्री (कु.) मधुराताई भोसले हिचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. हसतमुख
मधुराताई सतत आनंदी असते. ताईचे हास्य तिच्या नावाप्रमाणे मधुर आहे. तिचे हास्य पाहिले की, मधुराधिपती भगवान श्रीकृष्णाचे स्मरण होते.
२. नम्र
ताई ज्ञानी आहे. ताईला अध्यात्मातील विविध विषय, पुराणे, उपनिषदे इत्यादींचे ज्ञान आहे. तिला सूक्ष्मातूनही ज्ञान मिळते. असे असूनही ताई विनम्र आहे. तिला कोणत्याच गोष्टीचा अहं नाही.
३. इतरांना साधनेत साहाय्य करणे
मी तिच्याकडे गेल्यावर ती मला तिच्याकडील प्रसाद आवर्जून देते. मी ताईला काही वेळा माझ्या साधनेतील अडथळ्यांविषयी सांगते. तेव्हा ताई मला ‘त्यातून बाहेर कसे पडायचे ? त्यावर मात कशी करायची ?’, यांविषयी प्रेमाने सांगते. तिचे बोलणे ऐकून माझा साधनेचे प्रयत्न करण्याचा उत्साह वाढतो.
४. मायेतून अलिप्त
ताईला पहिल्यापासूनच मायेचे आकर्षण नाही. मी तिला कधी मायेतील गोष्टींविषयी बोलतांना पाहिले नाही. आरंभापासूनच तिची ओढ देवाकडे आहे.
५. गुरुसेवेची तळमळ
५ अ. तहान-भूक विसरून सेवा करणे : ताईला गुरुसेवेची तीव्र तळमळ आहे. ताई तहान-भूक विसरून सेवेशी पूर्णपणे एकरूप झालेली असते. ताई प्रत्येक दिवसाची नियोजित सेवा त्याच दिवशी पूर्ण करते. ती सेवा परिपूर्ण होण्यासाठीही प्रयत्नरत असते. एकदा ताईकडे एका यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा होती. यज्ञ उशिरा चालू झाला आणि त्याची पूर्णाहुती उशिरा झाली. तेव्हा ताईने यज्ञ पूर्ण झाल्यावरच महाप्रसाद ग्रहण केला.
५ आ. आध्यात्मिक त्रास होत असतांनाही सेवा करणे : ताईला आध्यात्मिक त्रास होत असतो, तरीही त्या त्रासाचा लवलेशही तिच्या चेहर्यावर दिसत नाही. एकदा ताईला तीव्र आध्यात्मिक त्रास होत होता, तरीही ती शांतपणे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा करत होती. तेव्हा मला तिच्यातील क्षात्रभाव आणि सहनशीलता या गुणांचे दर्शन झाले.
६. सतत देवाच्या अनुसंधानात असणे
ताई बोटमाळ घेऊन सतत नामजप करत असते. तिच्या खोलीत भ्रमणभाषवर सतत नामजप किंवा प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावलेली असतात.
७. गुरुंप्रती भाव
ताईमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव आहे. ताईच्या प्रत्येक शब्दातून तो भाव व्यक्त होतो. ताईच्या डोळ्यांमधेही तो भाव जाणवतो. तिला ‘गुरुदेवच सर्वस्व आहेत’, असे वाटते.
८. हे गुरुमाऊली, ‘मधुराताई म्हणजे आपल्या कृपेने पृथ्वीतलावर अवतीर्ण झालेली ज्ञानगंगा आहे’, असे मला वाटते. मधुराताई ज्ञानी आणि गंगेप्रमाणे निर्मळ आहे.
तिचा सहवास या जिवाला दिल्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते. ‘मधुराताईची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होवो’, अशी आपल्या चरणी आर्तभावाने प्रार्थना आहे.’
– कु. सुप्रिया सतीश जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२४)
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |