Kumbh In Uttar Pradesh : उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथील कुंभसाठी ४ सहस्र हेक्टर भूमीचा वापर करणार !
महाकुंभसाठी २ सहस्र ५०० कोटी रुपयांची तरतूद
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने प्रयागराज येथे होणार्या महाकुंभच्या सिद्धतेच्या दृष्टीने वर्ष २०१९ मधील ३ सहस्र २०० हेक्टरच्या तुलनेत २०२५ मध्ये हे क्षेत्र ४ सहस्र हेक्टर करण्यात आले आहे. मौनी अमावस्येला सुमारे ६ कोटी लोक येतील असा अंदाज आहे. कुंभसाठी २ सहस्र ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मौनी अमावास्या पुढील वर्षी म्हणजे वर्ष २०२५ मध्ये २९ जानेवारी या दिवशी आहे.
सरकारचे अन्य काही महत्त्वपूर्ण निर्णय
सरकारने मुरादाबाद विद्यापिठाचे ‘गुरु जांभेश्वर विद्यापीठ’ असे नामकरण करण्याला अनुमती दिली आहे. तसेच नोएडामध्ये ५०० खाटांच्या रुग्णालयाला संमती देण्यात आली आहे. हे रुग्णालय १५ एकर जागेवर बांधण्यात येणार आहे.