Crimes Against Afghan Women : तालिबानी दडपशाही थांबवण्यासाठी जागतिक कारवाई आवश्यक !
संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तानातील महिलांच्या स्थितीवर व्यक्त केली चिंता !
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या ‘यूएन् वुमन’ या संघटनेने एका नव्या अहवालात अफगाणिस्तानातील महिलांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातील महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर कारवाई करण्याची मागणी या संघटनेच्या अहवालात करण्यात आली आहे. गेल्या अनेक दशकांत अफगाणिस्तानमध्ये जी प्रगती झाली होती, ती तालिबानच्या ३ वर्षांच्या राजवटीत खुंटली असून आता अधोगती होत आल्याचे अहवालात म्हटले आहे.
UN Slams #Taliban Crimes Against Afghan Women and Girls; calls for immediate global action to end the injustice#UnitedNations #WorldNews #Genderapartheid #HumanRights #Afghanistan pic.twitter.com/y9zHRgQTUN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2024
तालिबानच्या राजवटीत महिलांची स्थिती बिकट
अहवालानुसार अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानने गेल्या काही वर्षांत ७० हून अधिक असे अधिकृत आदेश, विधाने आणि धोरणे लागू केली आहेत, ज्यांचा अफगाणिस्तानातील महिला अन् मुली यांच्या जीवनावर खोल परिणाम झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांसाठी गेल्या अनेक दशकांपासून आणि पिढ्यांपासून संघर्ष चालू आहे; परंतु ऑगस्ट २०२१ पासून देशात तालिबान राजवट स्थापन झाल्यानंतर अफगाणी महिला आणि मुली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. लैंगिक समानता नसल्यामुळे सर्व क्षेत्रांतील विकासावर परिणाम झाला आहे. प्रगतीच्या संधी मर्यादित आहेत आणि त्याचा परिणाम येणार्या पिढ्यांना जाणवू शकतो.
संयुक्त राष्ट्रांनी सादर केलेली चिंताजनक आकडेवारी !
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात अनेक चिंताजनक आकडेवारी मांडण्यात आली आहे. त्यानुसार अफगाणिस्तानातील ११ लाख मुली शाळेत जात नाहीत आणि १ लाखाहून अधिक महिला विद्यापिठांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत. अफगाणी महिलांना त्यांच्या जीवनावर परिणाम करणार्या सूत्रांवर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तालिबान प्रशासनात एकही महिला नेता नाही.
Summary report of country-wide women’s consultationsThis brief presents the perspectives of women across Afghanistan on their current situation and priorities. Since the Taliban. (हा अहवाल संक्षिप्त दृष्टिकोन मांडतो अफगाणिस्तानमधील महिलांचा त्यांच्या सद्य परिस्थिती आणि प्राधान्यक्रमांबद्दलचा, तालिबान राजवट स्थापन झाल्यानंतर !) |
महिलांमध्ये निराशेचे वातावरण
सामाजिकदृष्ट्या एकाकी पडल्यामुळे महिला आणि मुली निराश आहेत. मागील बराच काळ १८ टक्के महिला त्यांच्या जवळच्या कुटुंबाबाहेरील कोणत्याही महिलेला भेटल्या नाहीत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८ टक्के युवती किंवा महिला यांनी सांगितले, ‘आम्ही आमच्या ओळखीतील किमान एक स्त्री किंवा मुलगी यांना ओळखतो, ज्यांनी ऑगस्ट २०२१ नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.’
एका २६ वर्षीय अफगाणी महिलेने यूएन् वुमनला सांगितले की, महिलांना केवळ स्वतःच्या घरातच नव्हे, तर सरकारी आणि इतर ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार हवा आहे. त्यांना शिक्षण हवे आहे. महिलांना काम करायचे आहे. त्यांना स्वतःसाठी हक्क हवे आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या सत्तेत परतल्यानंतर समाजातील महिलांची स्थिती आणि परिस्थिती बिघडत चालली आहे.
संपादकीय भूमिका
|