Contempt of Prophet Muhammad : महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी इंडोनेशियात विनोदी कलाकाराला ७ मासांच्या कारावासाची शिक्षा
जकार्ता (इंडोनेशिया) – महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी इंडोनेशियातील एका विनोदी कलाकाराला ७ मासांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. औलिया रहमान असे त्याचे नाव आहे.
१. लॅम्पुंग अभियोजक कार्यालयाचे प्रवक्ते रिकी रामधन यांनी सांगितले की, औलिया रहमानने डिसेंबरमध्ये सुमात्रा बेटावर एकपात्री विनोदी कार्यक्रमात भाग घेतला होता. या वेळी औलियाने एक विनोद केला आणि सांगितले, ‘आज इंडोनेशियातील महंमद नावाचे अनेक लोक वाईट वागतांना दिसत आहेत.’ या विधानावरून ओलिया याला दोषी ठरवण्यात आले.
२. वर्ष २०१७ मध्ये इंडोनेशियाची राजधानी जकार्ताचे माजी गव्हर्नर बसुकी तजाहाजा पूर्णमा उपाख्य अहोक यांना महंमद पैगंबर यांच्या अवमानावरून २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. देशातील मानवाधिकार संघटनांनी या संदर्भातील कायद्याच्या विरोधात सातत्याने मोहीम चालवली आहे. ‘धार्मिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यासाठी या कायद्यांचा गैरवापर केला जातो’, असे त्यांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकाइस्लामी देशांत महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्यांवर कारवाई होते; मात्र भारतात हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर गुन्हाही नोंद होत नाही ! |