साधकांनी भावजागृतीचा प्रयोग करतांना पंचज्ञानेद्रियांनी अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
श्री. शशांक जोशी : मी प्रतिदिन भावजागृतीचा प्रयोग करतो. काही वेळा मी तुमची मानस पाद्यपूजा करतो, तर काही वेळा ‘मी तुम्हाला मर्दन करत आहे’, असा भाव ठेवतो. मी तुमची मानस पाद्यपूजा करत असतांना तुमचे चरणतीर्थ घेतल्यावरच माझे पूर्ण समाधान होते. मी तुम्हाला सूक्ष्मातून मर्दन करत असतांना माझ्या हाताला लागलेले तेल माझ्या सर्वांगाला लावल्यावरच माझे समाधान होते. मी असे करणे, म्हणजे माझे स्थुलात अडकणे आहे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : याला स्थुलात अडकणे म्हणत नाहीत. तुम्ही परिपूर्ण भावजागृतीचा प्रयोग करत आहात. तुम्ही पंचज्ञानेंद्रियांनी अनुभूती घेत आहात.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |