मोशी (पुणे) येथून २ महिलांसह ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
-
१२ वर्षांपूर्वी विनाअनुमती भारतामध्ये प्रवेश !
-
बनावट जन्म दाखला, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखलाही सिद्ध केला !
पिंपरी (जिल्हा पुणे) – बनावट कागदपत्रांसह घुसखोरी करून मोशी परिसरामध्ये रहाणार्या २ महिलांसह ४ बांगलादेशी नागरिकांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ‘दहशतविरोधी शाखे’ने अटक केली आहे. पूजा धन्नो सरकार उपाख्य रुबाया बिलाल शेख, पती धन्नो सरकार, दीर मन्नो सरकार आणि लाबोनी अय्यर उपाख्य साथी मंडल अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण १२ वर्षांपूर्वी भारतामध्ये आले होते. ही कारवाई ८ जून या दिवशी करण्यात आली, तसेच या घुसखोरांना बनावट कागदपत्रे बनवून देणार्या इतर आरोपींवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे घुसखोर बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना नसतांना वैध प्रवासी कागदपत्रांविना ते भारतात रहात होते. भारत आणि बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्यांच्या लेखी अनुमतीविना त्यांनी भारतामध्ये प्रवेश केला. ते गेल्या २ वर्षांपासून मोशी येथे वास्तव्यास होते. आरोपी धन्नो हा मोशी येथे रस्त्यावर फळविक्रीचा व्यवसाय करतो, त्याचा भाऊ मन्नो हा एका आस्थापनामध्ये कामाला आहे. त्यांनी बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला बनवून त्याच्या आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवायचे. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियमांतर्गत गुन्हे नोंद केले आहेत.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोर भारतात येणे हे संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते ! असे होऊ नये, यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक ! |