Geert Wilders On Hindus In Kashmir : काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या होऊ देऊ नका !
नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांचे आवाहन !
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – ‘पाकिस्तानी आतंकवाद्यांना काश्मीर खोर्यात हिंदूंची हत्या करू देऊ नका. भारतातील तुमच्या लोकांचे रक्षण करा !’, असे लिखाण (पोस्ट) नेदरलँड्सचे ‘पार्टी फॉर फ्रिडम’ या पक्षाचे अध्यक्ष असलेले खासदार गीर्ट विल्डर्स यांनी प्रसारित केले.
Don’t allow Pakistani terrorists in the Kashmir Valley killing Hindus.
Protect your people India! #AllEyesOnReasi— Geert Wilders (@geertwilderspvv) June 10, 2024
जम्मू येथील रियासी भागात हिंदु भाविकांवर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर विल्डर्स यांनी वरील लिखाण प्रसारित केले आहे. सध्या या घटनेवरून सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. यासाठी ‘ऑल आईज ऑन रियासी’ (सर्व लक्ष रियासीवर) हा ‘हॅशटॅग ट्रेंड’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) होत आहे. या हॅशटॅगसह गीर्ट विल्डर्स यांनी वरील पोस्ट केली आहे.
Do not let the killings of Hindus happen in Kashmir !
– Appeal of Netherlands MP @geertwilderspvvWhile a Christian leader in Europe is inclined to make such an appeal, not a single Hindu politician in India seems to be interested to do so.
This is equally shameful for the… pic.twitter.com/2KFVJV5dUe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2024
‘ऑल आइज ऑन राफा’वर बोलणारे आता गप्प का ?
इस्रायलकडून गाझा पट्टीतील राफा शहरावर करण्यात येत असलेल्या आक्रमणानंतर सामाजिक माध्यमांतून ‘ऑल आइज ऑन राफा’ (सर्व लक्ष राफावर) हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला आणि अजूनही तो चालू आहे. त्याद्वारे इस्रायलचा विरोध करण्यात येत आहे. त्यावर भारतातील अनेक मान्यवरांनी, तसेच कलाकारांनी समर्थनार्थ पोस्ट केले होते. त्याला आता जम्मूच्या रियासी येथील आक्रमणावरून टीका केली जात आहे. ‘राफाच्या समनार्थ बोलणार आता रियासी येथील आक्रमणातील पीडित हिंदूंच्या बाजूने का बोलत नाहीत ?’ असा प्रश्न सामाजिक माध्यमांतून विचारत ‘ऑल आइज ऑन रियासी’ असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ‘जेव्हा दुसर्या देशाचा प्रश्न असतो, तेव्हा बॉलीवूड सक्रिय रहातो; पण आपल्याच देशात आतंकवादी आक्रमणात मुले मारली जातात, तेव्हा ते त्यावर गप्प बसतात’, असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच गीर्ट विल्डर्स यांच्या आवाहनाचे कौतुकही केले जात आहे.
संपादकीय भूमिकायुरोपमधील एका ख्रिस्ती नेत्याला असे आवाहन करावेसे वाटते; मात्र भारतातील एकाही हिंदु राजकारण्याला असे सरकारला आवाहन करावेसे वाटत नाही, हे त्यांना निवडून देणार्या हिंदूंनाही तितकेच लज्जास्पद ! |