Valdevi River Fish Dead : नाशिक येथील वालदेवी नदीत सहस्रो मासे मृत्यूमुखी !

  • पाण्यात जिवाणू आढळले 

  • याआधीही सहस्रो माशांचा मृत्यू 

नाशिक – येथील वालदेवी नदीत साधारण २ कि.मी.च्या परिसरात सहस्रो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. महानगरपालिकेची ‘ड्रेनेज लाईन’ (सांडपाण्याची नलिका) फुटल्याने दूषित पाण्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत मासे पाण्यावर तरंगत असून नदीतील पाण्यात विविध प्रकारचे जिवाणूही आढळले आहेत. या प्रकरणी स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. याआधीही वालदेवी नदीपात्रात कारखान्यांमधील रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे सहस्रो मासे मृत झाले होते.

संपादकीय भूमिका

इतकी गंभीर घटना वारंवार होऊन महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष कसे करते ? अशा कर्तव्यचुकारांवर कठोर कारवाई व्हायला हवी !