Karnataka BJP Workers Attacked : पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीचा आनंद साजरा करणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर मुसलमानांकडून प्राणघातक आक्रमण
|
मंगळुरू (कर्नाटक) – येथील बोळीयारू भागामध्ये भाजपच्या ३ कार्यकर्त्यांवर ३० ते ४० धर्मांध मुसलमानांकडून चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यात हरीश, नंदकुमार आणि कृष्ण कुमार हे कार्यकर्ते घायाळ झाले. यातील हरीश हा गंभीररित्या घायाळ झाला आहे. सर्व घायाळांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. भाजपचे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा दुचाकी फेरीत काढत आनंद साजरा करत होते. यानंतर वरील तिघे जण घरी परतत असतांना धर्मांधांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत बोळीयारू भागातील मशिदीजवळ त्यांच्यावर आक्रमण केले. पोलिसांनी या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Deadly attack on BJP workers who were celebrating PM Modi’s swearing in; Md Shakir, Abdul Razak, Aboobakar, Sawad and Hafeez arrested
📍 Mangaluru (Karnataka) !
3 people injured: one is in critical condition.
It must be noted that the condition of Hindus in #Congress rule is… pic.twitter.com/7pjdJCknqt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2024
हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यास त्याला पोलीस आणि प्रशासन उत्तरदायी असतील ! – हिंदु जागरण वेदिकेची चेतावणी
हिंदूंवरील आक्रमणांच्या घटना वाढत असून राज्यातील काँग्रेस सरकारचे धोरण मुसलमान दंगलखोरांना प्रोत्साहनच देत आहे. अशा घटना पुढे चालू राहिल्या, तर जागृत हिंदु समाजाने याला प्रत्युत्तर द्यायला प्रारंभ केल्यास त्याला पोलीस आणि प्रशासन उत्तरदायी असतील, अशी चेतावणी हिंदु जागरण वेदिकने दिली आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात हिंदूंची दयनीय स्थिती होते, हे लक्षात घ्या ! ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’ असे म्हणून भाजपवर टीका करणारे ‘कर्नाटकमध्ये हिंदू असुरक्षित झाले आहेत’ यावर का बोलत नाहीत ? |