N Biren Singh Convoy Attacked : मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकावर आतंकवाद्यांकडून आक्रमण !
इंफाळ (मणीपूर) – राज्याचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांच्या सुरक्षा ताफ्यावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले. सुदैवाने मुख्यमंत्र्यांचा ताफ्यात समावेश नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या आगाऊ सुरक्षा पथकावर झालेल्या या आक्रमणात २ सुरक्षा कर्मचारी घायाळ झाले आहेत. विशेष म्हणजे सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह हिंसाचारग्रस्त जिरीबामला भेट देणार होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे आगाऊ सुरक्षा पथक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिरीबाम येथे जात होते.
#WATCH | Manipur: Visuals from a hospital in Imphal where the injured police officials of the advance security team of Manipur Police have been admitted after they were attacked by unidentified armed miscreants
The security team of Manipur Police had gone to Jiribam ahead of… pic.twitter.com/BfULlfRKDz
— ANI (@ANI) June 10, 2024
या घटनेनंतर मणीपूर पोलीस कमांडो आणि आसाम रायफल्स यांनी संयुक्त पथक बनवले असून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे.
संपादकीय भूमिकाईशान्येकडील आतंकवाद आता शासनकर्त्यांच्या मुळावर उठला आहे, हेच यातून दिसून येते. तेथील आतंकवाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! |