२ विमानांची धडक थोडक्यात टळली !
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील घटना !
मुंबई – ९ जून या दिवशी सकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंदौरहून आलेल्या इंडिगोच्या एका प्रवासी विमानाला मुंबई विमानतळावरील कर्मचार्यांनी लँडिंगची (उतरण्याची) अनुमती दिली; पण त्याच वेळी त्याच धावपट्टीवरून काही अंतरावरून एअर इंडिया ३५० हे विमान उड्डाण घेत होते. दोन्ही विमानांच्या ‘लँडिंग’ (उतरणे) आणि ‘टेक-ऑफ्’ (उड्डाण करणे) यांत काही क्षणांचे अंतर होते. ही वेळ थोडी जरी पुढे-मागे झाली असती, तर दोन्ही विमानांची एकमेकांना धडक बसली असती. या प्रकरणी डीजीसीएने (नागर विमानन महानिदेशनालयने) त्या कालावधीत कर्तव्य बजावणार्या कर्मचार्यांना तात्पुरत्या वेळापत्रकातून हटवले.
संपादकीय भूमिकादोन विमानांची धडक झाली असती, तर अनर्थ घडला असता ! हे पहाता विमानतळ प्रशासनाने संबंधित कर्मचारी योग्य प्रकारे कर्तव्य बजावतात का ? हे पहायला हवे ! |