जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्त एस्.टी.च्या मध्यवर्ती बसस्थानकात वृक्षदिंडी !

जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्त सजवलेल्या पालखीसह विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांसह अन्य

कोल्हापूर – जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने एस्.टी.च्या मध्यवर्ती बसस्थानकात सजवलेल्या पालखीत रोपे ठेवून वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रत्येक प्रवाशाने किमान एकतरी रोप लावावे आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. यानंतर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी आगार व्यवस्थापक अनिल म्हेत्तर, स्थानकप्रमुक मल्लेश विभूते, विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, वनक्षेत्रपाल प्रियांका दळवी, ‘एस्.टी. कष्टकरी जनसंघा’चे संचालक श्री. संजय घाटगे, दीपक घारगे, सोनल केसरकर, उत्तम पाटील यांसह अन्य उपस्थित होते.