नारेगाव (छत्रपती संभाजीनगर) येथे ३० रुपयांत पेयाची नशा !
गांजा आणि अवैध मद्य यांची उपाहारगृहे, पोलिसांचे दुर्लक्ष !
नारेगाव – नारेगाव हे अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे. या परिसरात गांजा आणि मद्य यांची खुलेआम विक्री होत आहे. आता तर ताडीच्या नावाखाली ‘कॅरीबॅग’मध्ये भरून अवघ्या ३० रुपयांत एक प्रकारचे पेय दिले जाते. हे पेय पाण्यात मिसळून प्यायल्यानंतर नशा चढते. यात कोणते रसायन मिसळलेले असते, यामुळे शरिराला हानी होऊ शकते का ? याची शहानिशा न करता तरुण आणि कामगार सर्रास या पेयाची नशा करत आहेत. हे सर्व चालू असतांना याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
छोटी धारावी म्हणून नारेगावची ओळख निर्माण होत आहे. या भागात अनेक छोटी आणि मोठी आस्थापने आहेत. नोकरदार, कामगार आणि लहान-मोठे व्यावसायिक येथे रहातात. मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. नशेच्या आहारी गेलेले तरुण आपल्या साथीदारावरच आक्रमण करून त्यांचा जीव घेत आहेत. अशा अनेक घटना या भागात घडल्या आहेत. नशेचे पदार्थ सहज उपलब्ध होत असतांनाही विक्री करणारे पोलिसांना कसे सापडत नाहीत ? असा प्रश्न आहे.
संपादकीय भूमिका
|