त्रिशूर (केरळ) येथे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये लाठ्या-काठ्यांद्वारे हाणामारी
त्रिशूरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आल्यावरून वाद !
त्रिशूर (केरळ) – केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत खाते उघडता आले आहे. त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश गोपी हे विजयी झाले आहेत. येथे काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात ७ जून या दिवशी झालेल्या बैठकीत कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यांच्यात लाठ्या-काठ्यांद्वारे हाणामारी झाली. या प्रकरणी एकूण काँग्रेसचे २० नेते आणि कार्यकर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष जोस वल्लूर आणि मुख्य सचिव संजीवन कुरीचिरा हे उपस्थित होते. येथील पराभवासाठी संजीवन कुरीचिरा यांनी जिल्हाध्यक्ष जोस वल्लूर आणि काँग्रेसचे माजी खासदार टी.एन्. प्रतापन् यांना उत्तरदायी ठरवले. या आरोपांमुळे जिल्हाध्यक्ष जोस वल्लूर आणि त्यांचे समर्थक अप्रसन्न होते. यानंतर येथे मारहाणीला प्रारंभ झाला. कार्यकर्त्यांनी संजीवन यांना मारहाण केली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. संजीवन यांनी जोस वल्लूर आणि त्यांच्या १९ साथीदारांविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
संपादकीय भूमिका
|