स्वतःला भगवंताशी जोडायला नाम हाच उपाय !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

‘परमात्मा कसा असतो’, असे म्हणून विचारले, तर काय सांगता येईल ? तो तर नाम, रूप आणि गुण यांच्या अतीत आहे; म्हणून आपल्या भावनेने जसा पहावा, तसा तो आहे, असे सांगता येईल, म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्याच्याजवळ काहीही मागितले, तरी तो द्यायला सिद्ध असतो. आपण विषय मागितले, तर तो देत नाही, असे नाही; पण त्यासमवेत त्याचे फळ म्हणून सुख-दु:खेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून काही मागायचे झाले, तर ते विचार करून मागावे. भगवंत जोडायला नामाखेरीज दुसरा कोणताच सोपा उपाय नाही. ‘भगवंताच्या नामाखेरीज मला काहीच कळत नाही’, असे ज्याला कळले, त्यालाच सर्व कळले.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून)