सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अनुभवलेली त्यांची कृपा !
८ जून २०२४ या दिवशी या लेखातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/801978.html
३. ब्रह्मोत्सवासाठी निघायच्या आदल्या दिवशी झालेले त्रास
३ उ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अमृतवचन आठवून स्थिर रहाता येणे आणि ओळखीच्या व्यक्तीने विचारल्यावर त्यांना ‘देव समवेत आहे’, असे सांगणे : मी रुग्णालयात भरती झाले. तेव्हा ‘माझ्या समवेत कुणी नाही’, याची मला जाणीव झाली आणि मला वाईट वाटले. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे ‘अमृतवचन’ मला आठवले. त्यांनी लिहिले होते, ‘कोणत्याही प्रसंगात मनाने स्वीकारणे, देवाला शरण जाणे आणि परिस्थितीला सामोरे जाणे’, हे अध्यात्मातील तीन गुण आत्मसात केल्यास मनातील प्रतिक्रियांचे प्रमाण न्यून होते.’ त्यांचे हे अमृतवचन आठवून मला स्थिर रहाता आले. त्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीने ‘समवेत कोण आहे ?’, असे मला विचारल्यावर मी त्यांना ‘देव माझ्या समवेत आहे’, असे सांगितले. नंतर रात्री मी घरी आले.
४. ‘मुलांना ब्रह्मोत्सव पहाता यावा’ यासाठी ‘गोवा येथे जायला हवे’, असे वाटणे; मात्र ‘प्रवासात काही त्रास झाल्यास साधकांची धावपळ होईल’, अशी भीतीही वाटणे
मी गोवा येथे जाण्याच्या दिवशी सकाळची नियमित कामे करत असतांना मला थकायला झाले. ‘मला अशा स्थितीत प्रवास करणे अवघड आहे’, असे वाटले. माझा आत्मविश्वासही न्यून झाला. मी यजमानांना माझ्या स्थितीविषयी सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मुलांना गुरुदेवांचे दर्शन होण्याची ही संधी आहे.’’ त्यामुळे ‘ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी जावे’, असे मला वाटत होते; परंतु ‘मला वाटेत काही झाले, तर साधकांची धावपळ होईल’, अशी मला मनातून भीती वाटत होती.
५. प्रवासाला निघाल्यापासून ब्रह्मोत्सवाची सांगता होईपर्यंत देवाच्या कृपेने काहीही त्रास न होणे
१०.५.२०२३ या दिवशी रात्री ८ वाजता आम्ही गोवा येथे जायला निघालो. खरेतर आम्ही प्रवासाला निघण्यापूर्वी माझ्यात १ घंटा उभी राहून काही करण्याची शक्ती नव्हती; मात्र पुणे ते गोवा प्रवास चालू झाल्यापासून ब्रह्मोत्सवाची सांगता होईपर्यंत मला कोणत्याही प्रकारच्या त्रासाची जाणीव झाली नाही. अन्य वेळी मला पुष्कळ श्रम झाले किंवा उष्ण वातावरणात राहिल्यावर माझ्यातील साखरेचे प्रमाण अल्प होऊन मला अकस्मात् चक्कर येते. ब्रह्मोत्सव पहातांना मला पुष्कळ गरम होऊन सातत्याने घाम येत होता, तरीही ‘मला कोणताही त्रास झाला नाही’, हे विशेष ! ‘ही केवळ देवाची कृपा आहे’, हे मी अनुभवले.
६. अविस्मरणीय अशा ब्रह्मोत्सवातील भावक्षणांच्या स्मृती
ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि चित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना रथात आरुढ झालेले पाहून ‘जीवनात आणखी काही नको’, असे वाटून माझी भावजागृती झाली. ‘गुरुदेव, आपण आम्हाला कल्पनेपलीकडचा आनंद मुक्त हस्ते दिलात’, त्यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.
७. गुरुदेवांच्या कृपेने दैवी आनंद अनुभवणे
गुरुदेव, आपण मला इथे घेऊन आलात. ब्रह्मोत्सवाच्या वेळी तुम्हीच मला स्वत:ला आणि माझ्या मुलांना सांभाळण्याची शक्ती दिली. मला ब्रह्मोत्सवातील दैवी आनंद अनुभवायला दिला. आश्रमातील साधकांना भेटल्यावर माहेरी आल्याचा आनंदही आपणच मला दिला. स्थुलातून आपण दूर होतात, तरीही तुम्ही मला सांभाळले आणि आनंद दिला.
८. परतीचा प्रवास
अ. ब्रह्मोत्सवाची सांगता झाली आणि आम्ही गाडीत बसलो. आमची गाडी मैदानाच्या बाहेर आली आणि त्या क्षणी माझ्या डोक्यात असह्य वेदना चालू झाल्या. ‘मला सावंतवाडीपर्यंतही प्रवास करणे शक्य नव्हते’, हे लक्षात आल्यावर आम्ही म्हापसा येथे रहाण्याचे ठरवले आणि तसे केले.
आ. १२.५.२०२३ या दिवशी सकाळी साडेसात वाजता आम्ही पुढचा प्रवास चालू केला. त्या वेळी संपूर्ण प्रवासात मला कसलाही त्रास झाला नाही.
९. ‘संतांना ‘साधकांनी ब्रह्मोत्सवासाठी जावे’,अशी असलेली तळमळ आणि त्यांच्यातील चैतन्य’ यांमुळे बळ मिळून ब्रह्मोत्सवाला जाण्याचे धाडस केले’, असे जाणवणे
‘पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी ‘आम्हा साधकांमध्ये ब्रह्मोत्सवाला जाण्याविषयी सकारात्मकता निर्माण व्हावी, ब्रह्मोत्सव अनुभवण्यासाठी उत्साह आणि तळमळ निर्माण व्हावी, एकाही साधकाला कसलीही अडचण येऊ नये’, यासाठी अथक प्रयत्न केले. ब्रह्मोत्सवानिमित्त झालेला प्रत्येक सत्संग भाव आणि चैतन्य यांच्या स्तरावर झाला. या सगळ्यांचा परिणाम म्हणून शारीरिक बळ नसतांनाही मी गोवा येथे जाण्याचे धाडस करू शकले’, असे हे लिखाण गुरुचरणी अर्पण करतांना मला जाणवले.
‘गुरुदेवा, आपणच आमच्याकडून आपल्याला अपेक्षित अशी साधना करून घ्या. मला आपल्या चरणांशी स्थान द्या’, अशी आपल्या चरणी अखंड प्रार्थना करते.’
– सौ. वसुधा योगेश डिंबळे, पुणे (१५.५.२०२३) (समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |