काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये ! – चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त निवेदन !
चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त निवेदन !
बीजिंग (चीन) – दक्षिण आशियातील विशेषत: काश्मीरमधील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही एकतर्फी कारवाईला आमचा विरोध आहे, असे निवेदन चीन आणि पाकिस्तान यांनी संयुक्तरित्या दिले आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ चीनच्या ५ दिवसांच्या दौर्यावर आहेत. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे निवेदन देण्यात आले.
१. चीनच्या बाजूने ‘जम्मू-काश्मीरचा वाद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ठराव आणि द्विपक्षीय करार यांनुसार न्याय्य अन् शांततापूर्ण मार्गाने सोडवला जावा’, असा पुनरुच्चार करण्यात आला. निवेदनात पुढे म्हटले आहे की, दोन्ही देशांच्या प्रमुखांनी चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाचे त्याच्या विरोधकांपासून संरक्षण करण्यास सहमती दर्शवली.
२. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील ग्वादर बंदराला चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडतो. हा महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून बांधला जात असल्याने भारताचा या महामार्गाला विरोध आहे.
संपादकीय भूमिका
|