पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गातील वावर्ले बोगद्याचे खोदकाम पूर्ण !
मुंबई – पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गातील सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. सध्या ठाणे- दिवा यातील पारसिक बोगदा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा आहे. वावर्ले बोगद्याद्वारे पनवेल येथून थेट लोकलगाडीने कर्जतला जाता येणार आहे. पनवेल-कर्जतदरम्यान सुमारे २९.६ कि.मी. लांबीचा दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. या मार्गात २ रेल्वे उड्डाणपूल, ८ मोठे पूल आणि ३६ लहान पूल उभारण्यात येणार आहेत. या मार्गिकेसाठी २ सहस्र ७८२ कोटी रुपये संमत झाले आहेत. सध्या एकूण ५० टक्के कामे पूर्ण झाले असून डिसेंबर २०२५ पर्यंत दुहेरी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.