तळेगाव दाभाडे (पुणे) नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांवर आरोपपत्र प्रविष्ट !
मद्य पिऊन गाडी चालवल्याचे प्रकरण
तळेगाव दाभाडे (पुणे) – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आला आहे. त्यांनी मद्य पिऊन चारचाकी गाडी चालवून अपघात केल्याचे निष्पन्न झाले आहे. पाटील यांचा ‘रक्ताचा नमुना’ सकारात्मक (पॉझिटीव्ह) आल्याने त्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येणार आहे. १ जून या दिवशी दुपारी मद्य पिऊन गाडी चालवत उभ्या असलेल्या २ वाहनांना धडक दिली होती. या प्रकरणी हानीग्रस्त गाडीमालक सिद्धराम लोणीकर यांनी पाटील यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.