सनातनच्या ३ गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) विश्वव्यापी कार्य !

१. विविध मार्गांनी कार्य करणार्‍या  ईश्वरी जिवांना दिशा देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

श्री. शंकर नरुटे

ईश्वराला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असून ती होणारच आहे. त्यासाठी ईश्व अंश असलेले अनेक ईश्वरी जीव कार्यरत आहेत. विविध मार्गांनी कार्य करणार्‍या ईश्वरी जिवांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दिशा देतात. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ईश्वरी कार्य करण्यासाठी या भूतलावर अवतरल्या आहेत. त्यांचीही ओळख हळूहळू समाजाला होऊ लागली आहे.

२. सनातनच्या ३ गुरूंची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची) जाणवलेली वैशिष्ट्ये

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे निर्गुण स्तरावरील कार्य ! : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांच्या अंतरंगामध्ये वास करतात. त्यांचे सध्याचे कार्य निर्गुण स्तरावरील आहे.

२ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे निर्गुण-सगुण स्तरावरील कार्य ! : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांच्या साधनेला दिशा देतात. त्या साधकांमध्ये गुरुदेवांप्रती भाव निर्माण करतात. त्या साधकांची व्यष्टी साधना व्यवस्थित होण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्या साधकांना धर्मप्रसाराची घडी बसवण्यासाठी साहाय्य करतात. त्यांचे कार्य निर्गुण-सगुण स्तरावरील आहे.

२ इ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे सगुण-निर्गुण स्तरावरील कार्य : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधकांच्या साधनेतील आध्यात्मिक अडथळे दूर करून सर्वांना साधनेत पुढे नेतात. त्यांचे कार्य सगुण-निर्गुण स्तरावरील आहे.’

– श्री. शंकर राजाराम नरूटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.११.२०२३)