Bhupesh Baghel : ६ महिने किंवा १ वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका होणार ! – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांचा दावा !
नवी देहली – काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिद्ध रहावे. ६ महिने किंवा वर्षभरात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत आहेत. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खुर्ची हलू लागली आहे. राजस्थानचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री भजनलाल शर्माही डगमगायला लागले आहेत, अशी पोस्ट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी ‘एक्स’वर केली आहे.
कार्यकर्ता साथी तैयार रहें!
6 महीने- 1 साल के भीतर मध्यावधि चुनाव हो सकते हैं.
फड़नवीस इस्तीफ़ा दे रहे हैं, योगी जी की कुर्सी डोल रही है. भजनलाल शर्मा भी डगमग-डगमग कर रहे हैं.
सरकार बनी नहीं है लेकिन जदयू प्रवक्ता अग्निवीर योजना रद्द करने और जातिगत जनगणना की बात कर रहे हैं.… pic.twitter.com/ufyt6aNJL6
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) June 7, 2024
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या नेत्यांना पंतप्रधान मोदी यांचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच ते पडण्याचीच स्वप्ने पडू लागली आहेत. त्यातून अशी विधाने केली जात आहेत. याचाच अर्थ भारत राजकीयदृष्ट्या अस्थिर रहावा, अशीच काँग्रेसवाल्यांची इच्छा आहे, हे लक्षात घ्या ! |