सांगली येथील लाचखोर महिला अधिकार्‍याकडून ४ लाख ५० सहस्र रुपयांची रोकड जप्त !

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली, ७ जून (वार्ता.) – शैक्षणिक संस्थेचे अनुदान मान्य करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेतांना समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे (वय ४० वर्षे) यांना रंगेहात पकडण्यात आले. या वेळी सातारा येथील त्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड घातली. त्यांनी घरातून ४ लाख ५० सहस्र रुपयांची रोकड जप्त केली. यासमवेत धनादेश काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याविषयी अटकेत असलेला निरीक्षक दीपक पाटील (वय ३६ वर्षे) याच्या घरीही अधिकार्‍यांनी धाड घातली. दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

संपादकीय भूमिका 

स्वतःच लाच घेणारे अधिकारी समाजकल्याण काय साधणार ?