Students Drown In Russian River : जळगाव येथील ३ विद्यार्थ्यांचा रशियातील समुद्रात बुडून मृत्यू !
जळगाव – रशियातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शाखेत शिकणारे जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीकिनारी शहराच्या समुद्रकिनार्याजवळ फेरफटका मारत होते. त्या वेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला. हर्षल देसले, जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी अशी त्यांची नावे आहेत. ‘रशियन फेडरेशन’मधील संबंधित एजन्सी पुढील कार्यवाही करत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद रशियातील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत.