सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अनुभवलेली त्यांची कृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव ११.५.२०२३ या दिवशी गोवा येथे होणार आहे आणि ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी गोवा येथे जाण्याची संधी मला मिळाली आहे’, असे मला समजले. त्या वेळी माझ्या मनात ‘आनंद आणि उत्सुकता’, असे भाव उमटले. ‘ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी गोवा येथे जायचे’, असे मी त्याच क्षणी निश्चित केले.
१. ११.५.२०२३ या दिवशीच मावसभावाचे लग्न असणे
१ अ. एक मास आधीपासूनच लग्नाला जाण्याची सिद्धता करणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी जायचे आहे’, असे समजण्याआधीच त्यांच्या कृपेने मनात ‘लग्नाच्या आधीच सर्वांना भेटून अहेर देऊया’, असा विचार येणे आणि त्याविषयी यजमानांना सांगणे : ११.५.२०२३ या दिवशी माझ्या मावसभावाचे लग्न होते. माझी १ मास आधीपासूनच लग्नाला जायची सिद्धता चालू झाली होती. मी मावशीलाही ‘लग्नाच्या ४ – ५ दिवस आधीच येणार’, असे सांगून ठेवले होते. आम्हाला उत्तरदायी साधकांकडून ज्या दिवशी प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाविषयी समजले, त्या दिवशी त्या विषयासंदर्भात सत्संग चालू होण्याच्या काही वेळ आधी मी यजमानांना सांगितले, ‘‘सर्वांना लग्नाच्या आधीच भेटून येऊ आणि लग्नाचा अहेर देऊ.’’ खरेतर मी उत्साहाने लग्नाला जाण्याची सिद्धता केली होती, तरीही ‘माझ्या मनात असे विचार का येत आहेत ?’, हेच मला कळत नव्हते. नंतर सत्संगात मला समजले, ‘११.५.२०२३ या दिवशी गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव आहे आणि त्यासाठी मला जाण्याची संधी मिळाली आहे.’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘गुरुदेवांनीच सूक्ष्मातून मला लग्नाच्या आधीच सर्वांना भेटून येण्याविषयी सुचवले होते.’
१ आ. मावशीला लग्नाला येत नसल्याविषयी सांगता येणे : मावशी आणि तिचे यजमान यांना मी लग्नाला येत नसल्याचे खरे कारण सांगितले. मी त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे मला जाण्याची आवश्यकता का आहे ?’, हेही स्पष्टपणे सांगितले. त्यांनी ते आनंदाने स्वीकारले. ‘ही सर्व गुरुदेवांची कृपा’, असे माझ्या लक्षात आले.
२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे जायचे आहे’, असे समजल्यापासून त्यांचे चैतन्य वातावरणात कार्यरत झाले आहे’, असे वाटणे आणि घरात दैवी कण आढळणे
‘परात्पर गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे’, असे मला सत्संगात समजले. ‘त्या दिवसापासून आमच्या घरातील वातावरण पालटले’, असे मला जाणवले. मी घरातील केर काढत असतांना ‘प्रत्येक खोलीत दैवी कण आहेत’, असे माझ्या लक्षात येत असे. त्या दिवसापासून मला प्रतिदिन दैवी कण आढळत होते. ‘प.पू. गुरुदेवांचे चैतन्य वातावरणात कार्यरत झाले आहे’, असे मला हे दैवी कण पाहून वाटले.
३. ब्रह्मोत्सवासाठी निघायच्या आदल्या दिवशी झालेले त्रास
३ अ. पहाटेपासून अस्वस्थता जाणवणे, उत्तरदायी साधकांना ‘थकवा असल्याने एवढा मोठा प्रवास करणे आणि ब्रह्मोत्सव पहायला जाणे शक्य होणार नाही’, असे सांगणे अन् ‘हे अनिष्ट शक्तींचे अडथळे आहेत’, असे लक्षात येऊन त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे : ११.५.२०२३ या दिवशी गोवा येथे होणारा ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी ‘१०.५.२०२३ या दिवशी संध्याकाळी पुणे येथून निघायचे’, असे आमचे निश्चित झाले होते. ९.५.२०२३ या दिवशी पहाटे साडेतीन वाजल्यापासून मला अस्वस्थ वाटू लागले. मला खोकलाही येत होता. मला नंतर झोप लागली नाही. मी सकाळी आढावा भरण्याची सेवा केली आणि सकाळी ८ वाजता उत्तरदायी साधकांना आढावा देण्यासाठी भ्रमणभाष केला. त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘मला बरे वाटत नाही. मला थकवा जाणवत आहे. त्यामुळे मला एवढा मोठा प्रवास करायला आणि ब्रह्मोत्सव पहायला शक्य होणार नाही.’’ तेव्हा ‘माझ्या मनात अनिष्ट शक्ती विचार घालत आहेत’, असेही मला वाटत होते आणि मी त्यावर मात करण्याचा प्रयत्नही करत होते.
३ आ. ‘ब्रह्मोत्सवासाठी जायचे असल्याने प्रकृती चांगली होण्यासाठी औषधे घेऊया’, असा विचार करून चिकित्सालयात जाणे : माझी शारीरिक स्थिती सकाळी १० वाजेपर्यंत आणखी बिघडली; म्हणून मी चिकित्सालयात जाऊन औषध आणायचे ठरवले. मला ‘ब्रह्मोत्सवासाठी उद्या निघायचे असल्याने औषध घेऊन प्रकृती चांगली करायला हवी’, या उद्देशाने मी आधुनिक वैद्यांकडे गेले.
३ इ. चिकित्सालयात गेल्यावर बसण्याचीही शक्ती नसणे आणि आधुनिक वैद्य येईपर्यंत तपासणी करण्याच्या पलंगावर झोपायला तेथील कर्मचार्याने सांगणे : माझा चिकित्सालयात लवकर क्रमांक लागावा, यासाठी मी तेथे लवकर पोचले; पण आधुनिक वैद्य आले नव्हते. त्यामुळे मी त्यांची वाट पहात बाकावर बसले. त्या वेळी मला बसवत नव्हते; म्हणून तेथील कर्मचार्याने मला आधुनिक वैद्यांच्या तपासणी करण्याच्या पलंगावर झोपायला सांगितले. त्या वेळी ‘ब्रह्मोत्सवासाठी जाण्याची सिद्धता करणे, प्रवास करणे आणि ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी माझ्या मुलांना सांभाळणे’, या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर आल्या आणि मला वाटले ‘हे सर्व मला जमणे अशक्य आहे.’
३ ई. आधुनिक वैद्यांनी ‘पुष्कळ थकवा असल्याने सलाईनमधून औषधे द्यावी लागतील आणि २ दिवस रुग्णालयात थांबावे लागेल’, असे सांगणे : आधुनिक वैद्यांनी मला तपासले आणि सांगितले, ‘‘तुम्हाला पुष्कळ थकवा आला आहे. तुम्हाला सलाईनमधून औषधे दिली, तर तुम्हाला लवकर बरे वाटेल. तुम्हाला २ दिवस रुग्णालयात थांबावे लागेल.’’ आम्हाला दुसर्या दिवशी गोवा येथे जाण्यासाठी निघायचे होते. यजमानांकडे प्रवासाला निघणार्या साधकांचा समन्वय करण्याचे दायित्व होते. ‘मी रुग्णालयात भरती झाले, तर त्यांना मुलांना सांभाळून सेवा करणे अवघड जाईल’, असे वाटून मी यजमानांना संपर्क केला आणि त्यांना माझी परिस्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तू संध्याकाळपर्यंत रुग्णालयात थांब आणि नंतर ‘तुला कसे वाटते ?’, ते पाहून आपण उद्याचे ठरवू.’’ आमचे असे बोलणे झाल्यावर मी आधुनिक वैद्यांना ‘मी एक दिवस रुग्णालयात थांबू शकते’, असे सांगितले. त्यांनी मला भरती करून घेतले.
(क्रमश:)
– सौ. वसुधा योगेश डिंबळे, पुणे (१५.५.२०२३)
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव होणार आहे’, अशी पूर्वसूचना काही मास आधी स्वप्नांच्या माध्यमातून मिळणे१. दोन मासांत पडलेल्या स्वप्नांत ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि त्या वेळी सर्व साधक त्यांना पहाण्यासाठी उभे आहेत’, असे दिसणे : ‘जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३ या मासांत मला दोन स्वप्ने पडली. त्या दोन्ही वेळा मला स्वप्नात दिसले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सार्वजनिक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या वेळी ते साधकांमधून जात आहेत आणि आम्ही सर्व साधक त्यांना पहाण्यासाठी उभे आहोत. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे माझ्याकडे लक्ष जाते. ते मला म्हणतात, ‘मी विचारणारच होतो की, वसुधा कशी दिसत नाही ?’ त्या वेळी मी गुरुदेवांसमोर हात जोडून उभी आहे. त्यांनी मला विचारले, ‘तू आश्रमात कधी येणार ?’, मी त्यांना सांगितले, ‘आता लगेच यायला सिद्ध आहे.’ २. स्वप्नांत गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर समष्टी सेवा चालू करणे : ‘गुरुदेव मला आश्रमात बोलवत आहेत’, असा मी त्याचा अर्थ घेतला. काही कारणाने थांबलेली माझी समष्टी सेवा मला स्वप्नांत गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर पुन्हा चालू झाली. गुरुदेवांना सेवा करणारे साधक आवडतात. मला आश्रमात जायचे, तर ‘मला सेवा करायला हवी’, या विचाराने मी सेवा करू लागले. ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी ते रथात आरूढ होऊन मार्गक्रमण करतांना पाहून स्वप्नांची आठवण होणे : ११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले त्यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी ते आरूढ असलेला रथ साधकांमधून मार्गक्रमण करतांना मी पाहिला आणि मला स्वप्नांची आठवण झाली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी स्वप्नांत असेच दृश्य पाहिले होते.’ ‘गुरुदेवांचा सार्वजनिक सोहळा होणार असल्याची पूर्वसूचना स्वप्नांच्या माध्यमातून मला मिळाली होती’, असे मला त्या क्षणी जाणवले.’ – सौ. वसुधा योगेश डिंबळे, पुणे (१५.५.२०२३) |
|