आपत्काळात गोमाता वरदान ठरणार !
येणार्या आपत्काळात गोमाता आपल्यासाठी वरदान असल्याचे सिद्ध होईल; कारण तिच्या शेणापासून आपल्याला इंधन प्राप्त होते. जर भाजीपाला उपलब्ध झाला नाही, तर आपण दूध-दही यांच्या समवेत भात आणि पोळी-भाकरी खाऊ शकतो. आपत्काळात जेव्हा ॲलोपॅथीची औषधे मिळणार नाहीत, तेव्हा पंचगव्य चिकित्सापद्धतीचा अवलंब करून लोकांची चिकित्सा करू शकतो. वाहन नसल्यास बैलगाडीचा उपयोग करू शकतो. थोडक्यात गोमाता आपत्काळासाठी आपली आवश्यकता असेल. त्यामुळे तिच्याप्रती शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भाव ठेवून तिची सेवा करावी.