हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या झाकीर नाईकवर कठोर कारवाई करा !
हिंदु जनजागृती समितीच्या मागणीचे यवतमाळ येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
यवतमाळ, ७ जून (वार्ता.) – संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ जूनला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठवण्यात आले. या वेळी निवेदन देतांना स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचाचे कोषाध्यक्ष श्री. राकेश मिश्रा, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मणलाल खत्री, सनातन संस्थेचे श्री. पांडुरंग पिल्लेवार, समितीचे सर्वश्री दत्तात्रय फोकमारे, विजय जाधव उपस्थित होते.