कडेगाव (जिल्हा सांगली) येथे लाच घेतांना नगरपंचायतीच्या लिपिकास अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेल्या नगरपंचायती !
कडेगाव, ७ जून (वार्ता.) – तक्रारदाराच्या भावाने खरेदी केलेल्या भूमीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी २४ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कडेगाव नगरपंचायतीचा लिपिक सागर माळी (वय ३२ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. माळी याच्याविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.