कल्याण येथील शिवसेना शहरप्रमुखांना धमकी देणारा अटकेत !
कल्याण – कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांना दोन दिवसांपूर्वी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणार्या प्रकाश भीमसेन बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मानसिक अस्वास्थ्य आणि आर्थिक अडचण यांमुळे हा प्रकार केल्याचे बनसोडे यांनी मान्य केले.
संपादकीय भूमिकाकायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच असे प्रकार घडतात ! अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |