श्री नृसिंहमंत्राचा जप करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सौ. सौम्या कुदरवळ्ळी

१. स्वतःकडून होत असलेल्या श्री नृसिंहमंत्रजपाविषयी जाणवलेली सूत्रे

अ. ‘मागील एक मासापासून माझ्याकडून श्री नृसिंह स्वामी यांचा ‘ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।’ (‘हे कृद्ध अन् शूरवीर अशा महाविष्णु, तुझी ज्वाला (तप्तपणा) सर्वत्र पसरली आहे’) हा मंत्रजप आपोआप होत आहे. मी इतरांशी बोलत असतांना किंवा मी इतरांचे बोलणे ऐकत असतांनाही माझ्याकडून हा मंत्रजप एकाग्रतेने होतो.

आ. माझ्याकडून हा मंत्रजप एकाग्रतेने होत असतांना मला ३ – ४ वेळा हा मंत्रजप ऐकू येतो आणि ‘त्याचा मला लाभ होत आहे’, असे जाणवते. मला हा मंत्रजप थांबवता येत नाही. नृसिंह भगवानच माझ्याकडून हा मंत्रजप करून घेतात.

इ. रात्री झोपेतही माझा हा मंत्रजप चालू असतो. ‘माझ्याकडून हा मंत्रजप श्वासासह होत आहे’, असे मला जाणवते.

ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मी हा मंत्रजप करू शकत आहे. ‘या मंत्रजपाच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटते.

२. मंत्रजप केल्याने झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती

अ. माझ्याकडून हा मंत्रजप केला जाण्यापूर्वी आमच्या देवघरातून नृसिंह स्वामी आणि तिरुपती बालाजी यांच्या चांदीच्या मूर्ती कुणीतरी पळवून नेल्या होत्या. मी हा मंत्रजप करणे चालू केल्यावर कुणीतरी त्या मूर्ती पुन्हा तेथे आणून ठेवल्या.

आ. आरंभी मी मंत्रजप करण्यासाठी जपमाळ वापरत होते. त्या जपमाळेला चंदनाचा सुगंध येत आहे.

इ. हा मंत्रजप केल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मला वाटणारी भीती न्यून झाली आहे.

ई. मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवते.

मला या अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सौम्या कुदरवळ्ळी, भाग्यनगर (१२.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक