Nepal Recalls Ambassadors : नेपाळ सरकारने भारत आणि अमेरिका यांच्यासह ११ देशांतील राजदूतांना परत बोलावले !
काठमांडू – नेपाळ सरकारने ११ देशांतील राजदूतांना परत बोलावले आहे. यांमध्ये भारत आणि अमेरिका येथे नियुक्त करण्यात आलेल्या राजदूतांचाही समावेश आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेस पक्षासोबतची युती तोडून के.पी. शर्मा ओली यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
१. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. या भारत दौर्यापूर्वी नेपाळ सरकारने हे पाऊल उचलले आहे.
२. नेपाळचे परराष्ट्रमंत्री श्रेष्ठ यांनी नेपाळी काँग्रेसच्या कोट्यातून नियुक्त केलेल्या राजदूतांना परत बोलावण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता; परंतु पंतप्रधान प्रचंड आणि ‘सी.पी.एन्-यू.एम्.एल्.’चे अध्यक्ष ओली यांनी मनमानीपणे राजदूतांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्यांनी सांगितले.