‘Son of Hamas’ Mosab Hassan Yousef : आपण इस्लामशी लढलो नाही, तर जग धोक्यात येईल ! – मोसाब हसन युसेफ
हमासच्या संस्थापकाच्या मुलाचे मोठे विधान; इस्रायला समर्थन !
तेल अविव (इस्रायल) – जिहादी आतंकवादी संघटना हमासचा सहसंस्थापक शेख हसन युसेफ याचा मुलगा मोसाब हसन युसेफ ‘हमास कसा दहशत पसरवतो ?’ हे उघड केले आहे. आता त्याने मोठे वक्तव्य केले आहे. ‘ग्रीन प्रिन्स’ म्हणून ओळखला जाणारा मोसाब म्हणाला, ‘पॅलेस्टाईन इस्रायलच्या विनाशावर अवलंबून आहे. पॅलेस्टाईनची काही व्याख्या असेल, तर त्याचा अर्थ ‘इस्रायलचा विनाश’ असा होतो.’ ‘जेरुसलेम पोस्ट’च्या कार्यक्रमात तो बोलत होता. ‘जर आपण इस्लामशी लढलो नाही, तर जगाला धोका आहे. आपल्याला जागे होण्याची आवश्यकता आहे आणि जर आपण या अस्तित्वाच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले किंवा ते नाकारले, तर आपल्याला त्याचा सामना करावा लागेल’, असेही तो या वेळी म्हणाला.
If we don’t fight I$l@m, the world will be in danger – Mosab Hassan Yousef, son of #Hamas co-founder and ex-militant of Hamas.
Further seeks support for #Israel
👉 Mosab Hassan Yousef is a Mu$|!m, not a Hindu, and even then he is saying this.
It is equally true that no… pic.twitter.com/3bk5EwRV4L
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2024
१. मोसाब पुढे म्हणाला की, मला तुम्हाला विचारायचे आहे की, पॅलेस्टाईन म्हणजे काय ? तो वांशिक गट आहे का ? एक धर्म आहे का ? विशिष्ट भाषा आहे का ? त्यांच्याकडे (पॅलेस्टाईनकडे) धर्मग्रंथ आहेत का ? ते एक राष्ट्र्र आहे का ? ते एक देश होते का ? यांपैकी काहीही नसेल, तर पॅलेस्टाईन म्हणजे काय ? पॅलेस्टाईनचा उद्देश काय आहे ?, असे प्रश्न त्याने विचारले.
२. मोसाब याच्या मते ‘पॅलेस्टिनी प्राधिकरण’ (पीए) हा हमासपेक्षा मोठा धोका आहे. ‘पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशन’ची सर्व जागतिक अराजकता ‘पीए’द्वारे व्यवस्थापित केली जाते. पीए त्याच दहशतवादातून आला आहे, जो हमास किंवा ‘मुस्लिम ब्रदरहूड’मधून (मुसलमानांचे बंधुत्व) उद्भवलेल्या इतर कोणत्याही गटातून येतो.
३. या कार्यक्रमात मोसाब याने अनुमाने १४ शतकांपासून मुसलमानांच्या हातून ज्यूंच्या होणार्या हत्याकांडाचा इतिहास सांगितला. ज्यू लोकांनी ते स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्यांनी टीका केली. तो म्हणाला की, मला वाटते की, ज्यू लोकांनी हे सत्य मान्य केले, तर त्यांना बहुसंख्य मुसलमानांचा सामना करावा लागेल. सध्या इस्रायलच्या विरोधात एवढा अपप्रचार केला जात आहे की, जेव्हा लोक दिवसातून सहस्रो वेळा ते पहातात, तेव्हा त्यांचा त्यावर विश्वास बसू लागतो.
मोसाबचा इतिहास
मोसाब हा माजी पॅलेस्टिनी आतंकवादी आहे. वर्ष १९९७ मध्ये तो इस्रायलमध्ये गेला आणि वर्ष २००७ मध्ये तो अमेरिकेला जाईपर्यंत त्याने इस्रायली सुरक्षा गट ‘शिन बेट’साठी गुप्तहेर म्हणून काम केले.
संपादकीय भूमिकाहमासच्या संस्थापकाचा मुलगा हिंदुत्वनिष्ठ नसून मुसलमान आहे, तसेच तो हमासचा माजी आतंकवादीही आहे. तोच हे सांगत आहे. यावर भारतातीलच नव्हे, तर जगातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि इस्लामप्रेमी कदापि विश्वास ठेवणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे ! |