UN Security Council : पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा झाला तात्पुरता सदस्य !
पुन्हा आळवला काश्मीरचा राग !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली. तो २ वर्षांसाठी सुरक्षा परिषदेचा सदस्य रहाणार आहे. त्याचा कार्यकाळ १ जानेवारी २०२५ पासून चालू होणार आहे. यापूर्वी तो ७ वेळा तात्पुरता सदस्य होता.
#Pakistan obtains a seat as a non-permanent member of the United Nations Security Council
Brings up the #Kashmir issue once again !
👉 Rather than persistently pursuing the Kashmir issue, Pakistan should contemplate on whether it will remain an undivided nation.#UNSC… pic.twitter.com/bGMVXKiuJb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2024
सुरक्षा परिषदेचे सदस्य म्हणून पाकची निवड होताच त्याने पुन्हा एकदा काश्मीरचा सूत्र उचलून धरले आहे. संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी त्यांच्या प्राधान्यक्रमांची सूची वाचून दाखवली. त्यात दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे, पॅलेस्टाईन आणि काश्मीरमधील लोकांसाठी स्वयंनिर्णयाचे तत्त्व कायम ठेवणे, अफगाणिस्तानमधील सामान्यीकरणाला चालना देणे, आफ्रिकेतील सुरक्षेला प्रोत्साहन देणे आदींचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तानने काश्मीरचा राग आळवण्यापेक्षा पाकिस्तान अखंड रहाणार आहे का ?, याचा अधिक विचार करण्याची आता आवश्यकता आहे ! |