गोहत्या बंदीचा कायदा करण्यासाठी आंदोलन करणार्‍या संतांनाच ठार मारून गोहत्याविरोधी आंदोलन चिरडून टाकणार्‍या इंदिरा गांधी !

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी

‘ख्रिस्ताब्द १९६६ या वर्षी देशातील संतांनी एकत्र येऊन गोहत्या बंदीचा कायदा होण्यासाठी  संसदेवर मोर्चा काढला. या मोर्च्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि त्यात ११ संत धारातिर्थी पडले. अशा प्रकारे काँग्रसने गायीच्या आंदोलनाचा कणाच मोडून काढला.’ – पू. निरंजनभाई वर्मा, गोतज्ञ, चेन्नई, तामिळनाडू. (१८.५.२०१३)

‘या देशात जे प्राण्यांच्या अधिकारांची चर्चा करतात, ते धर्मनिरपेक्ष असतात; पण जेव्हा आम्ही गोरक्षणाची चर्चा करतो, तेव्हा आम्ही धर्मांध कसे ठरतो ?’

– निखिल कनौजिया, हिंदु सेवा परिषद (दैनिक सनातन प्रभात, २.४.२०१७)