‘केवळ एका गायीपासूनही विपुल धन कसे मिळवता येऊ शकते ?’, याचे गणित
गोमाता दुधासह गोमूत्र आणि शेणही देत असते. दूध न देणारी भाकड गायसुद्धा तिचे गोमूत्र आणि गोमय (शेण) यांच्या आधारे गोपालकाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकते. पुढील आर्थिक गणित सर्वत्रचे गोपालक आणि गोशाळांचे व्यवस्थापक यांनी लक्षात घेतल्यास भारतातील गोशाळांवर दान मागण्याची पाळी कधीही येणार नाही.
१. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ : केवळ दुधाची विक्री न करता तूप आणि ताक यांच्यापासून औषधांची निर्मिती केल्यास जास्त आय मिळते. सामान्यतः १ देशी गाय प्रतिदिन २ लिटर दूध देते. ३० लिटर दुधाचे दही लावून ते घुसळून त्यातून लोणी काढून तूप केल्यास १ लिटर तूप मिळते. म्हणजे एका गायीपासून प्रतिमास २ लिटर तूप मिळते. तुपापासून औषध बनवल्यास एका लिटरला न्यूनतम ६ सहस्र रुपयांपर्यंत दर मिळतो. म्हणजे एका मासात केवळ तुपाद्वारे १२ सहस्र रुपये मिळू शकतात. तूप काढतांना शिल्लक राहिलेल्या ताकापासूनही तक्रारिष्ट, ताक अर्क यांसारखी औषधे बनवता येतात.
२. गोमूत्र
२ अ. गोमूत्र अर्कापासून प्रतिमास ९ सहस्र रुपये मिळू शकणे : एक गाय एका रात्रीत ३ लिटर गोमूत्र देते. ३ लिटर गोमूत्रापासून दीड लिटर गोमूत्र अर्क बनतो. चांगल्या प्रतीच्या गोमूत्र अर्काचे मूल्य २०० ते ३०० रुपये प्रतिलिटर एवढे आहे. अर्काचे मूल्य सरासरी २५० रुपये प्रतिलिटर धरल्यास दीड लिटर अर्कापासून प्रतिदिन ३७५ रुपये मिळू शकतात. यातील ७५ रुपये अर्क बनवण्याचा व्यय म्हणून वगळल्यास प्रतिदिन ३०० रुपये हाती रहातात. म्हणजेच प्रतिमास अर्कापासून ९ सहस्र रुपये मिळू शकतात.
२ आ.गोमूत्र अर्क बनवतांना राहिलेल्या गाळापासून प्रतिमास १८ सहस्र रुपयांचे औषध बनू शकणे : गोमूत्र अर्क बनवल्यावर जो गाळ शिल्लक रहातो, त्यापासून गोमूत्राच्या गोळ्या बनवता येतात. यांना ‘गोमूत्र घनवटी’ असे म्हणतात. ३ लिटर गोमूत्रापासून १५० ग्रॅम गोमूत्राचा घन (मावा) बनतो. या घनामध्ये १५० ग्रॅम औषधी चूर्ण मिसळले जाते आणि अशा प्रकारे ३०० ग्रॅम घनवटी (गोळ्या) बनते. आज १०० ग्रॅम घनवटीचे मूल्य ३०० रुपये आहे. म्हणजे ३०० ग्रॅम घनवटीचे ९०० रुपये होतात. यातील ३०० रुपये खर्च वगळून ६०० रुपये हाती रहातात. अशा रितीने घनवटीद्वारे प्रतिमास १८ सहस्र रुपये मिळवता येतात, तर अर्कआणि घनवटी या दोघांद्वारे प्रतिमास २७ सहस्र रुपये मिळू शकतात.
२ इ. गोमूत्रापासून सेंद्रिय कीटकरोधक बनवल्यास प्रतिमास १० सहस्र रुपयांची बचत होऊ शकणे : गोमूत्राचा उपयोग शेतीला उपयोगी असे सेंद्रिय कीटरोधक बनवण्यासाठीही करता येतो. एका दिवसाच्या गोमूत्रापासून ३ लिटर सेंद्रिय कीटकरोधक बनवता येते. १ लिटर कीटकरोधकामध्ये ९ लिटर पाणी घालून १० लिटर द्रव बनतो, जो एक चतुर्थांश एकर भूमीमध्ये फवारणीसाठी पुरेसा होतो. याप्रमाणे १ एकर शेतीसाठी ४ लिटर गोमूत्र लागते, जे गोमाता आपल्याला २ रात्रींत देते. म्हणजेच एकरी १ सहस्र रुपयांचे रसायन वापरून होणारेकार्य २ रात्रींच्या गोमूत्रानेसाध्य होते; म्हणजेच प्रतिदिन ५०० रुपये या भावाने प्रतिमास १५ सहस्र रुपयांची बचत होते. यामधून ५ सहस्र रुपये खर्च म्हणून वगळले, तरी प्रतिमास १० सहस्र रुपयांची बचत होते.
३. गोमय (शेण)
३ अ. गोमयापासून औषधी भस्म बनवल्यास मासिक ४५०० रुपयांचे उत्पन्न मिळू शकणे : गोमय औषधांमध्ये वापरतात. गोमयाच्या गोवर्या बनवून त्यापासून गोमय भस्म बनवतात. एका दिवसाच्या (१० कि.ग्रॅ.) गोमयापासून अर्धा किलो गोमय भस्म बनते. या भस्माचे मूल्य ३०० रुपये प्रतिकिलो आहे. याप्रमाणे मासिक १५ किलो गोमय भस्माचे ४५०० रुपये होतात.
३ आ. गोमयापासून अन्य औषधे, गृहोपयोगी वस्तूआणि सौंदर्यप्रसाधने बनवून उत्पन्नात वाढ करणे शक्य असणे : याशिवाय गोमयापासून वेदनाशामक तेल, लेप, धूपबत्ती, डासरोधक उदबत्ती, साबण, सौंदर्यप्रसाधने अशा व्यवहारोपयोगी वस्तूही बनवता येतात. यांद्वारे जास्त आर्थिक लाभ होतो.
३ इ. गोबर गॅस आणि गोवर्या यांमुळे इंधनाचा प्रश्न सुटणे आणि महागडे गॅस सिलिंडर विकत घ्यावेन लागणे : गोबर गॅस आणि गोवर्या यांचा इंधनासाठी वापर करता येतो. आज गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडत आहेत. अशा परिस्थितीत गोबर गॅस हा फारच अमूल्य असा इंधनसाठा आहे.
३ ई. शेतीसाठी गोमयाचा वापर केल्यास रासायनिक खतांचा मोठा खर्च टळणे : शेतकरी एका पिकासाठी ३ वेळा ‘यूरिया’, ‘डीएपी’ यांसारखी रासायनिक खते वापरत असतो. या सर्वांचा एका पिकासाठी एकरी ३.५ सहस्र रुपये खर्च येतो.
गोमयाचा शेतामध्ये खत म्हणून वापर केल्यास हा खर्च टळतो. एका पिकासाठी शेतकर्याला ३ वेळा रासायनिक खते वापरावी लागतात; परंतु पुरेशा प्रमाणात शेतामध्ये गोमय वापरल्यास ३ वर्षांपर्यंत वेगळे खत द्यावे लागत नाही. म्हणजे एक वेळ वापरलेले गोमय ६ पिकांपर्यंत पुरेसे होते. हाही गोमयाचा मोठा लाभ आहे.
‘केवळ एकटी गाय प्रतिवर्षी न्यूनतम ३ लक्ष रुपयांचे निवळ उत्पन्न मिळवून देऊ शकते’, हे लक्षात घ्या !
एक गाय सामान्यपणे प्रतिदिन २ लिटर दूध, ३ लिटर मूत्र आणि १० किलो गोमय देते. गोमूत्र आणि गोमय यांचा औषधे बनवण्यासाठी वर्षभरामध्ये ९ मास, तर शेतीसंबंधी कीटकनाशके आणि खते बनवण्यासाठी ३ मास वापर करता येतो. गाय एकदा व्यायल्यावर ८ मास दूध देते. दूध, गोमूत्र आणि गोमय या सर्वांचा वरीलप्रमाणे सदुपयोग केल्यास एक गोमाता आपल्याला वर्षभरामध्ये न्यूनतम ३ लक्ष रुपयांचे निवळ उत्पन्न मिळवून देऊ शकते.
स्वस्त आणि सुरक्षित गोमूत्र अन् नैसर्गिक आपदांना झेलण्याची क्षमता असलेली सेंद्रिय शेती
कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोमूत्राची फवारणी केल्यास कीटक मरून न जाता पळून जातात. त्यामुळे आपल्याला या कीटकांच्या हत्येचे पाप लागत नाही. गोमूत्राच्या फवारणीमुळेमित्र कीटकांच्या संख्येत वाढ होते आणि असेकीटक शत्रूकीटकांचा नाश करतात. गोमूत्र अत्यंत स्वस्त आणि सुरक्षित आहे. ‘सेंद्रिय शेती करणार्या शेतकर्याने आत्महत्या केली’, असे आजपर्यंत ऐकिवात नाही. माझ्या स्वानुभवावरून सांगतोकी, ज्या शेतामध्येनेहमी गोमूत्र आणि गोमय यांचा वापर होत असतो, तेथेकीटकांचा प्रादुर्भाव होत नाही आणि झालाच, तर गोमूत्र फवारणीनंतर कीटक लगेच पळून जातात. सेंद्रिय शेतीमध्ये येणार्या पिकांमध्ये नैसर्गिक आपदांना झेलण्याची क्षमता असते. वादळ इत्यादी झाल्याने रासायनिक शेतीद्वारे आलेले पीक जिथेपूर्णपणे भुईसपाट होते, तिथे सेंद्रिय शेतीद्वारे आलेल्या पिकाचे एवढे नुकसान होत नाही.
– संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ – गोसंवर्धन
केवळ एकटी गाय प्रतिवर्षी न्यूनतम ३ लक्ष रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवून देऊ शकते’, हे लक्षात घ्या !
गोपालनाने होणारे आर्थिक लाभ
अ. चतुर्विध पुरुषार्थांमध्ये अर्थाचे महत्त्व : ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. आर्य चाणक्य म्हणतात, ‘अर्थ एव प्रधानः । अर्थमूलौहि धर्माकामाविति ।।’ (कौटिलीय अर्थशास्त्र, अधिकरण १, अध्याय ७, सूत्र ६ आणि ७) म्हणजे ‘अर्थ’ हाच मुख्य पुरुषार्थ आहे; कारण धर्मआणि काम हे अर्थावरच अवलंबून असतात.’ ‘अर्थ’ म्हणजे ‘धन मिळवणे’; परंतु तेही सन्मार्गाने, म्हणजे धर्माने सांगितलेल्या मार्गानेच मिळवावे, असे शास्त्र सांगते. म्हणूनच प्राचीन भारतियांनी अर्थप्राप्तीसाठी कृषी, पशूपालन यांसारख्या मार्गांचा वापर केला, मोठमोठे कारखाने उघडून लोकांना लुटण्याची व्यवस्था बनवली नाही.
आ. सन्मार्गाने विपुल अर्थप्राप्तीसाठी गोमातेला शरण जाणे आवश्यक : गोमातेमध्ये साक्षात् लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे सन्मार्गाने विपुल अर्थप्राप्ती करायची असेल, तर गोमातेला शरण जाणे आवश्यक आहे. बहुतेक लोकांना ‘गायीच्या दुधाला मूल्य मिळते’, एवढेच ठाऊक असते; परंतु ‘गोमय (शेण) आणि गोमूत्र यांपासून दुधापेक्षाही अधिक अर्थलाभ करून घेता येतो’, हे माहीत नसते.
इ. गोपालन आणि शेती एकत्रित असणे लाभदायक : आज शेती न करता केवळ दुधासाठी गोपालन केल्यामुळे ‘गाय म्हणजे तोटा’, असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे. शासनाने विविध सवलती देऊनसुद्धा गोपालन तोट्याचे बनत चालले आहे. गोपालन आणि शेती हे एकमेकांना पूरक असे व्यवसाय आहेत.