विदेशी गाय आणि भारतीय गाय यांतील भेद !
१. विदेशी गाय म्हणजे ‘गोमाता’ नव्हे !
‘भारतीय गाय माणसाची नित्य सहचारिणी आहे. आरंभापासूनच या गायींना माणसाचे प्रेम मिळाले आहे; परंतु विदेशी गायींचे तसे नाही. विदेशी गायी पूर्वी बरीच वर्षे जंगलामध्ये हिंसक पशूंच्या रूपाने फिरून नंतर माणसाच्या घरी पाळल्या जाऊ लागल्या. भारतीय गायींच्या पाठीवर असलेले वशिंड (उंच भाग) आणि गळ्याखालची झालर (लोंबणारी त्वचा), ही यांना ओळखण्याची विशिष्ट खूण आहे. जर्सीसारख्या विदेशी प्राण्यांची आकृती गायीच्या आकृतीशी मिळतीजुळती असल्याने विदेशी गायीला अजाणतेपणी भारतीय गायीच्या समतुल्य समजले जाते. काही जातींची हरणे, म्हशी, गायी आणि बैल यांत एवढे साम्य असते की, एका जातीला पाहिल्यावर दुसर्या जातीचा भास होतो. म्हणून हे स्पष्ट आहे की, अन्य देशातील गायी या खर्या गायी नव्हेत.
पुढील दोन चित्रांपैकी प्रत्येक चित्राकडे १ – २ मिनिटे पाहून तुम्हाला काय वाटते ? प्रयोग करा !
२. जंगलातील हिंस्र पशूंपासून झालेली विदेशी गायीची निर्मिती
पाश्चात्त्य गायींचा पूर्वज ‘यूरास्’ (जर्मन भाषेत ‘यूरच्’) नामक एक जंगली आणि हिंसक प्राणी आहे. हा प्राणी वाघ, सिंह, गेंडा, अस्वल इत्यादींप्रमाणे जंगलात फिरत असे. याची उंची ७ फुटांहून अधिक, तर शिंगे ३ फूट लांब असत. याच्या शरिरावरील केस काळे किंवा भुरे होते. आजही इंग्लंडच्या काही अभयारण्यातील जंगली गायी अशा आकृतीच्या काळ्या वासरांना जन्म देतात. या यूरास् प्राण्याला लोकांनी जंगलातून आणून पाळणे चालू केले आणि तेथील आदिवासींच्या प्रयत्नांनी हा पशू हळूहळू दूध देणार्या प्राण्याच्या रूपात परिवर्तित झाला. विदेशी गायी भारतीय गायींप्रमाणे सरळ स्वभावाच्या नसतात, यावरूनही या सिद्धांताला पुष्टी मिळते.’
(संदर्भ : कल्याण – गोसेवा अंक, १९९५)
३. विदेशी गाय आणि गोमाता (भारतीय गाय) यांतील भेद
४. जर्सीसारख्या प्राण्यांचे डुकरांशी साधर्म्य असणे
जर्सीसारखे प्राणी डुकरिणींप्रमाणे भरपूर दूध देतात. एक डुकरीण एका वेळी अनेक पिल्लांना जन्म देते. एका वेळेला ७-८ पिल्ले दूध पिऊ शकतील, असे तिचे आचळ फार मोठे असते. ‘विदेशी वैज्ञानिकांनी गाय आणि डुक्कर यांचा संकर करून ‘जर्सी’ हा प्राणी निर्माण केला’, असे एक मत प्रचलित आहे.
५. न्यूझीलंडसारख्या देशात भारतीय गायींची जोपासना होण्यामागील कारण !
भारतीय वंशाच्या गायींमध्ये हे विषारी प्रथिन नसते. भारतीय वंशाच्या गायींच्या दुधाला ‘ए-२’ प्रकारचे दूध’ असे म्हणतात. हे दूध आरोग्यदायी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे असते. न्यूझीलंडसारख्या देशाने वेळीच जागे होऊन गेल्या १० वर्षांपासून आपल्या देशात ‘ए-२’दुधाची पूर्तता करण्यासाठी भारतातून ‘ए-२’ प्रकारचे, म्हणजे गीर, साहिवाल, कांकरेज, खिल्लार इत्यादी जातींचे गोवंशीय स्वतःच्या देशात नेऊन त्यांची जोपासना चालू केली आहे. तेथील जनतेला ‘ए-२’ प्रकारचे शुद्ध दूध मिळावे; म्हणून तेथे वेगळी ‘ए-२ दूध विक्री केंद्रे’ स्थापन केली आहेत.
६. भारतियांनो, विदेशी गायीचे नको, तर देशी गोमातेचे संवर्धन करा !
विदेशी गाय आणि म्हैस यांपेक्षा देशी गोमाता सर्वार्थाने श्रेष्ठ अाहे. जे गोपालक जर्सीसारखे विदेशी प्राणी आणि म्हशी पाळत आहेत, त्यांनी टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडील या पशूंची संख्या घटवून देशी गायी पाळण्यास आरंभ करावा. आज ब्राझिलसारख्या देशांनी भारतातून गीर गायी नेऊन तेथील दुग्धोत्पादनात वाढ केली आहे; मात्र भारतात दुधाची वाढती मागणी पुरवण्यासाठी विदेशी गाय आणि म्हैस यांचे संवर्धन होत आहे.
भारतात विदेशातून होल्स्टिन फ्रिजियन गायींची आयात होत आहे. यामुळे देशबांधवांना रोगांच्या खोल दरीत ढकलले जात आहे. विदेशातील लोक भारतीय गायींचे संवर्धन करत आहेत आणि भारतातील काही तथाकथित गोवैज्ञानिक मात्र ‘विदेशी गोवंशियाचा देशी गोवंशियाशी सतत संकर केल्यास त्याच्या ७ पिढ्यांनंतर देशी गोवंशीय निर्माण होतो’, असे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. भारताला पुन्हा विश्वगुरु बनवायचे असेल, तर सर्व भारतियांना गोमातेचे दूध पाजावे लागेल.तरच भारतियांची प्रतिभा जागृत होऊन खर्या अर्थाने देशाचा विकास होऊ शकेल. यासाठी विदेशी गायींचे नव्हे, तर देशी गायींचे संवर्धन करावे लागेल.