सांबराच्या शिंगांची तस्करी करणारा तरुण अटकेत !
ठाणे – वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी स्वप्नील उपाख्य नोबी पाल या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सांबराची दोन शिंगे जप्त करण्यात आली आहेत. ५ लाख रुपयांना या शिंगांची विक्री पाल करणार होता. या तरुणाविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
एका उपाहारगृहाजवळ पकडल्यावर शिंगांच्या संदर्भात पोलिसांनी विचारणा केल्यानंतर प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वन विभागाच्या अधिकार्यांनी त्याच्याविषयी तक्रार केली होती.