शिळफाटा रस्त्यावरील खोदकामामुळे रहिवासी त्रस्त !
काम थांबवण्याची ठेकेदारांकडे मागणी
डाेंबिवली – गेल्या महिन्यापासून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शिळफाटा रस्त्यावर चालू आहे. हा रस्ता कायम गजबजलेला आणि वर्दळीचा असतो. त्यामुळे येथे रात्रीच्या वेळी अवजड यंत्रणेच्या साहाय्याने खोदकाम चालू असते. यंत्राच्या कर्णकर्कश आवाजाने झोपमोड होत असल्याने परिसरातील रहिवासी, उद्योजक, तसेच व्यापारी त्रस्त आहेत. रात्रीच्या वेळी खोदकाम करू नका, अशी मागणी त्यांनी ठेकेदाराकडे केली आहे. ठेकेदाराने सांगितले की, रात्रीचे काम थांबवायचे असेल, तर तुम्ही एम्.एम्.आर्.डी.ए.च्या वरिष्ठ अधिकार्यांना भेटा.