व्यष्टी साधनेचा आढावा प्रामाणिकपणे देणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी (वय ४० वर्षे)!
‘सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी हिच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा माझ्याकडे आहे. ही सेवा करतांना मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. रूपाली तिच्या साधनेच्या प्रयत्नांचा आढावा प्रामाणिकपणे देते. तिच्याकडून जे प्रयत्न झाले नाहीत, त्याविषयीही ती प्रामाणिकपणे सांगते. ती ‘यापुढे कोणते प्रयत्न करणार ?’, हेही सांगते.
२. साधनेचे प्रयत्न झाले नाहीत, तरी ती आढाव्याला आवर्जून उपस्थित असते. तिला वेळ नसेल किंवा काही सेवा असेल, तर ती आढाव्याला उपस्थित राहून स्वतःचा आढावा देऊन जाते.
३. एखाद्या वेळी तिला आढाव्याला उपस्थित रहायला जमले नाही, तर ती मला भ्रमणभाष करून ‘तुला कधी वेळ आहे ?’, असे विचारते आणि आढावा देते.
४. मला तिचा आढावा घ्यायला जमले नाही, तर ती मला लघुसंदेश करून आढावा देते.
५. आढाव्याच्या वेळी ‘स्वतःमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे’, ही तिची तळमळ जाणवते.’
– सौ. सुषमा सुनील नाईक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२४)