ब्रह्मोत्सव भूवरी, आनंदली भुवने सारी ।
ब्रह्मोत्सव (टीप १) भूवरी, आनंदली भुवने सारी ।
देवी, देवता, महर्षीगण अवतरित झाले ।
अतिउत्साहे जीवसृष्टी नटली, सजली ।
पंचप्राण एकवटुनी तव दर्शने आतुर झाली ।
हे विश्वव्यापका जनार्दना हरि गोविंदा ।। १ ।।
रूप पहाता लोचनी अश्रू दाटले नयनी ।
श्री सद्गुरूंची त्रिमूर्ती (टीप २) प्रगट होऊनी ।
दाही दिशा टाकिल्या लख्ख उजळूनी ।
आनंद मावेना नाथा त्रिभुवनी ।
हे श्रीविष्णुस्वरूपा हरि गोविंदा ।। २ ।।
दुरूनी आलो आम्ही, व्हावी तुझी प्राप्ती ।
अतिश्रमे थकलो, आता न उरली काही शक्ती ।
तूच वाढवी देवा, तुझे ठायी अनन्य भक्ती ।
इतुकेच मागणे आमचे तुजसी असे श्रीपती ।
हे मोक्षदाता, तू भगवंता हरि गोविंदा ।। ३ ।।
प्रक्रियारूपी (टीप ३) गंगेत नहाता ।
निर्मळ करीसी आमच्या चित्ता ।
तेथे तुझे प्रतिबिंब पहाता ।
स्पष्टची दिसे ऐसे करी अनंता ।
हे आदि-मूळ स्वरूपा, हरि गोविंदा ।। ४ ।।
दावूनिया ब्रह्मोत्सव सोहळा ।
ब्रह्मा आनंद दिधला सकळा ।
अवघा संसार भक्ती रसात बुडवला ।
कोटी कोटी नमन श्रीहरि भक्तवत्सला ।
हे परब्रह्म सच्चिदानंदा, हरि गोविंदा ।। ५ ।।
टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव.
टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ.
टीप ३ – प्रक्रिया म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न.
– सौ. विमल माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |