प्रत्येक योगमार्गामध्ये ‘सत्संग’ हा महत्त्वाचा घटक असणे !
‘ज्ञानयोग, कर्मयोग किंवा हठयोग अशा कोणत्याही साधनामार्गाने साधना करत असलो, तरी प्रथम तो साधनामार्ग संबंधित उन्नतांकडून शिकावा लागतो. शिकल्यानंतर पुढे त्यानुसार कृती करतांना येणार्या अडचणी आणि त्यासंदर्भातील शंका यांचे निरसनही करून घ्यावे लागते. साधना शिकण्यासाठी उन्नतांचे असे निरंतर मार्गदर्शन घेणे, यालाच ‘सत्संग’ म्हणतात. त्यामुळे सर्वच साधनामार्गांसाठी ‘सत्संग’ हा एक महत्त्वाचा घटक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले