Muslim Factor Loksabha Elections : देशात ९० पैकी केवळ २३ मुसलमान उमेदवार विजयी !
उत्तरप्रदेश आणि बंगाल राज्यांत अधिक विजयी
नवी देहली – देशातील लोकसभा निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्षांनी ९० मुसलमान उमेदवार उभे केले होते. त्यांतील केवळ २३ उमेदवार विजयी झाले आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या २६ होती. त्या वेळी १३६ मुसलमान उमेदवार उभे होते. वर्ष २०१४ मध्ये २१६ उमेदवारांपैकी २३ खासदार म्हणून निवडून आले होते.
१. आता जिंकलेल्या २३ उमेदवारांमध्ये काँग्रेसचे ७ आणि तृणमूल काँग्रेसचे ५ उमेदवार आहेत. बंगालच्या ४२ पैकी ६ आणि उत्तरप्रदेशच्या ८० पैकी ५ जागांवर मुसलमान उमेदवार विजयी झाले.
२. भाग्यनगर, मुर्शिदाबाद, धूबडी, बारामुल्ला, श्रीनगर आणि लक्षद्वीप येथे मुसलमान उमेदवार निवडून आले आहेत. ५० टक्क्यांहून अधिक मुसलमान लोकसंख्या असणार्या बंगालच्या बहरामपूर जागेवर प्रथमच मुसलमान उमेदवार जिंकला आहे. येथे तृणमूल काँग्रेसचे यूसुफ पठाण यांनी काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांना पराभूत केले.
३. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे गतवेळपेक्षा तुलनेत या वेळी १० जागांवर मुसलमान उमेदवार विजयी झाले आहेत. मागच्या वेळी ४ मुसलमान उमेदवार विजयी झाले होते.
23 Mu$|!m candidates including Yusuf Pathan of the #TrinamoolCongress out of 90, have won the Loksabha elections.
🔸Majority of them in the states of Uttar Pradesh and Bengal.
👉 Although a fewer Mu$|!m candidates have won, it is equally true that several Hindu MPs from the… pic.twitter.com/PMyaSqf7ac
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 5, 2024
संपादकीय भूमिका२३ मुसलमान उमेदवार विजयी झाले, ही संख्या अल्प असली, तरी तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षांचे विजयी झालेले अनेक हिंदु उमेदवार हिंदूंसाठी नाही, तर मुसलमानांसाठीच अधिक काम करतात, हे लक्षात घ्यायला हवे ! |