‘Child Justice Board’ Judge Transferred : ‘बाल न्याय मंडळा’च्या न्यायाधिशांचे स्थानांतर !

पुण्यातील ‘पोर्शे’ कारच्या अपघात प्रकरण

पुणे – कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने ‘पोर्शे’ कार चालवत २ तरुणांना ठार मारले. तेव्हा त्याला बाल न्याय मंडळासमोर उपस्थित केले असता त्याला ‘वाहतूक प्रश्‍नांवर ३०० शब्दांचा निबंध लिही’ अशी शिक्षा देऊन त्वरित जामीनावर मुक्त करण्यात आले होते. यासह अल्पवयीन आरोपीस वाहतुकीच्या प्रश्‍नावर ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगण्यात आला. त्यावर सामान्य नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या.

त्यानंतर बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी एम्.पी. परदेशी यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘रजिस्ट्रार जनरल’ यांनी न्यायाधिशांच्या स्थानांतरणाचा आदेश दिला आहे. पुणे येथील बाल न्याय मंडळाचे २ सदस्य डॉ. एल्.एन्. धनावडे आणि के.टी. थोरात हे शासननियुक्त सदस्य आहेत.