Rahul Gandhi : कुठल्या मतदारसंघाचे त्यागपत्र देणार याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही ! – राहुल गांधी, काँग्रेस

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

नवी देहली – राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती अन् ते दोन्ही ठिकाणी विजयी झाले आहेत. वायनाड येथे ते मागील निवडणुकीतही विजयी झाले होते. या २ पैकी एका मतदारसंघाचे त्यांना त्यागपत्र द्यावे लागणार आहे.

याविषयी त्यांना पत्रकारांनी विचारणा केल्यावर राहुल गांधी म्हणाले की, याविषयी मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. पक्षामध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल.