China Moon Mission : चंद्रावर उतरलेले चीनचे यान येत आहे माघारी !
चंद्रावरील २ किलो माती आणणार
बीजिंग (चीन) – चीनचे चंद्राच्या गडद अंधाराच्या भागात यशस्वीपणे उतरलेले ‘चांगई-३’ हे यान आता माघारी येत आहे. नियोजनानुसार येत्या २५ जूनला हे यान मंगोलियाच्या वाळवंटात उतरणार आहे. चंद्रावर उतरल्यानंतर या यानाने चंद्रावरील अनुमाने २ किलो माती गोळा केली असून ती समवेत आणली जात आहे. ही माती गोळा करण्यासाठी या यानावर खोदकाम करण्यासाठी आणि नंतर ढिगारा उचलण्यासाठी यांत्रिक हात बसवण्यात आले होते.
China’s Chang’e-6 Coming Back Carrying Moon Rocks
The samples collected are expected to provide new insights into the moon’s geology and history.#LunarMission #MoonMission pic.twitter.com/6gBi69Qi21
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 5, 2024
चंद्रावरून आणण्यात येणार्या या मातीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्याद्वारे शास्त्रज्ञ चंद्र, पृथ्वी, सौर मंडळाची निर्मिती अन् उत्क्रांती यांच्याविषयी अधिक माहिती मिळवू शकतील.