पनवेल येथील सनातनचा बालसाधक चि. पार्थ परब याचे सुयश !
पनवेल – येथील सनातनचा बालसाधक चि. पार्थ संजय परब (वय ५ वर्षे) याला ‘गीता परिवारा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन श्रीमद्भगवद्गीता संथा वर्गा’च्या परीक्षेत सुयश मिळाले आहे. त्याने या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्याला सर्वाेत्कृष्ट श्रेणी मिळाली आहे. या परीक्षेच्या अंतर्गत असणार्या उच्चारांतील स्पष्टता, तत्परता, अनुस्वार, विसर्ग, आघात शुद्धता या पैलूंचाही विचार गुणांमध्ये करण्यात आला आहे.