मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अनुमती देऊ नका !
|
जालना – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता अंतरवाली सराटी गावातूनच विरोध होत आहे. येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत ‘मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अनुमती नाकारावी’, अशी मागणी केली आहे. ‘मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी गावातील जातीय वातावरण खराब होत आहे’, असा गंभीर आरोपही या ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात केला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून ४ जूनपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाला प्रारंभ करणार असल्याचे घोषित केले आहे; मात्र या आंदोलनाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यामुळे या आंदोलनाविषयी साशंकता उपस्थित होत आहे.