कलवड परिसरात (पुणे) सरकारी भूमीवर ताबा मिळवून धर्मांधांनी उभारला अवैध मदरसा !
पुणे – शहरातील कलवड परिसरात काही धर्मांधांनी सरकारी भूमीवर ताबा मिळवून त्यावर अवैधपणे मदरसा उभारला आहे. लोकसभा निवडणुकीचा अपलाभ घेत येथील भूमीवरील झाडे तोडून नाल्यांमध्ये भराव टाकून त्यावर एक मोठे पत्र्याचे शेड उभारून मदरसा चालवला जात आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप !
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या अवैध बांधकामाला पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही अनुमती दिलेली नसून अवैधपणे शेड उभारून हा मदरसा चालवला जात आहे. स्थानिकांच्या विरोध प्रदर्शनानंतर मुसलमान मौलानाकडून स्थानिक नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. उभारण्यात आलेल्या अवैध बांधकामावर आणि मदरशावर कुठलीही कारवाई झाली नसून पालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (अवैध बांधकामावर कारवाई न केल्याप्रकरणी संबंधित पालिका अधिकार्यांवर कारवाई करायलाच हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअवैधपणे मदरसा बांधेपर्यंत पोलीस, प्रशासन झोपले होते का ? कि ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले ! |