पुणे येथे मानसिक त्रास देणार्या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !
पुणे – आरोपी जॉनी जिलानी शेख याने पीडितेशी भ्रमणभाषवरून ओळख वाढवली. प्रेमसंबंध निर्माण केले. तिची चित्रफीत आणि काही छायाचित्रे काढली. ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर ‘ती’ चित्रफीत (व्हिडिओ) प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित करीन’, अशी आरोपीने धमकी दिली. पीडितेने आरोपीचा भ्रमषभाष क्रमांक स्वतःच्या भ्रमणभाषमधून काढून टाकल्यावर आरोपीने भ्रमणभाषमधील (अश्लील) चित्रफिती आणि छायाचित्रे प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली. पीडितेच्या काही नातेवाइकांनाही पाठवली. या प्रकरणी २६ वर्षीय पीडितेने तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांच्या विरोधात केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक ! |