सौ. आराधना चेतन गाडी यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी आलेली अनुभूती
१. ‘प.पू. गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव आहे’, असे आतून समजणे
‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवासाठी मी वाहनातून जात होते. तेव्हा ‘आज ‘ब्रह्मोत्सव’ आहे’, हे मला ठाऊक नव्हते; परंतु मला मनातून वाटत होते की ‘आज प.पू. गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव आहे.’
२. ‘तिरुपती बालाजी यांचा जयघोष करावा’, असे उत्स्फूर्तपणे आणि आतून वाटत असणे
मला वाहनात बसल्यावर ‘तिरुपती बालाजी यांचा आणि श्री वेंकटेश्वर स्वामीजी यांच्या नामावळीचा जयघोष करावा’, असे मला वाटत होते. मला हे सर्व उत्स्फूर्तपणे आणि आतून वाटत होते.
३. वाहनात बसल्यावर श्री वेंकटेश्वर स्वामी यांच्या नामावलीचा जयघोष होणे
मी आश्रमातून कार्यक्रमस्थळी वाहनातून जात होते. त्या वेळी माझ्याकडून आपोआप पुढील जयघोष होऊ लागले; म्हणून मी सर्व साधकांना म्हणाले, ‘‘आपण सर्वजण श्री वेंकटेश्वर स्वामी यांचा जयघोष करूया !’’ आणि आम्ही सर्वजण श्री वेंकटेश्वर स्वामी यांच्या नामावलीचा जयघोष करू लागलो,
वेंकटरमणा, गोविंदा, गोविंदा ।
नंदनंदना, गोविंदा, गोविंदा ।
गोविंदा हरि गोविंदा ।
वेंकटरमणा गोविंदा ।
आपत् बांधव गोविंदा ।
अनाथ रक्षक गोविंदा ।
नीलमेघश्याम गोविंदा ।।
असा वेंकटरमण यांचा जयजयकार आमच्याकडून होत होता. त्यामुळे आमची भावजागृती होत होती. आम्ही ‘साक्षात् श्रीमन्नारायण यांच्या ब्रह्मोत्सवाला जात आहोत’, असे आम्हाला जाणवत होते.
४. देवाने तिरुपती बालाजी यांचा जयघोष करून घेणे आणि पूर्वसूचनेची अनुभूती देणे
आम्ही कार्यक्रमस्थळी पोचलो. त्या वेळी श्री. विनायक शानबाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी सांगितले, ‘‘महर्षींनी नाडीवाचनात सांगितले आहे की, तुम्ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव तिरुपती बालाजींसारखा साजरा करा.’’ तेव्हा ‘माझ्याकडून यासाठीच तिरुपती बालाजी यांचा जयघोष देवाने करून घेतला आणि मला पूर्वसूचनेची अनुभूती दिली’, असे मला वाटले. त्याबद्दल मी श्रीमन्नारायण (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. आराधना चेतन गाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |