Karnataka Rape Case : कर्नाटकात भूत उतरवण्याच्या नावाखाली मौलवीकडून मुलीवर लैंगिक अत्याचार !

  • मौलवीला अटक !

  • अत्याचार करणार्‍या मुलीच्या भावालाही अटक !

(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

(प्रतिकात्मक चित्र)

चित्रदुर्ग – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी मौलवी अब्दुल रहमान याला अटक करण्यात आली आहे. ३१ मे या दिवशी ही घटना घडली होती; मात्र ती विलंबाने उघड झाली आहे. मुलीला भूताने पछाडले असल्याचे सांगत मौलवीने तिला बोलावले होते. त्यानंतर भूत काढण्याच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर त्या मुलीच्या भावाचा बुद्धीभेद करून त्यालाही मुलीवर अत्याचार करण्यास भाग पाडले. मुलीच्या भावालाही अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात चित्रदुर्ग येथील पोलीस अधीक्षक धर्मेंद्र कुमार मीना म्हणाले की, मौलवीने मुलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका

अन्य वेळी हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे वासनांध मौलवीच्या संदर्भातील बातम्यांना प्रसिद्धी देत नाहीत, हे जाणा !